ठाण्यात पेट्रोल पंपावर दरोडा; लाखोंची लूट, पाच आरोपी गजाआड!
ठाण्यात पेट्रोल पंपावर दरोडा; लाखोंची लूट, पाच आरोपी गजाआड! विकास काटे
मुंबई/पुणे

ठाण्यात पेट्रोल पंपावर दरोडा; लाखोंची लूट, पाच आरोपी गजाआड!

विकास काटे, साम टीव्ही

विकास काटे

ठाणे: पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लूट करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील पाच जणांना कापूरबावडी पोलिसांनी करून बेड्या ठोकल्या आहेत. ता. ३१ जानेवारी रोजी रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ब्रॉडवे ऑटो मोबाईल्स एच. पी. सी. एल. पेट्रोलपंप कापुरबावडी नाका, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे दरोड्याची घटना घडली आहे. या दरोड्यात आरोपीनी २७ लाख ५० हजार रुपयांची लूट केली होती. पोलीस पथकाने आरोपीना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून लुटीतील १५ लाख २०० रुपयांची रोकड हस्तगत केली. अटक केलेल्या आरोपीमधील बहुतांश आरोपी हे पेट्रोलपंपावर काम करणारे आहेत किंवा अनुभवी असल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे. (Thane News In Marathi)

३१ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजता ब्रॉडवे ऑटो मोबाईल्स एच. पी. सी. एल. पेट्रोलपंप कापुरबावडी नाका, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे त्यांचे ऑफीसचे दरवाज्याचे दोन्ही एटोमेटिक लॉक उघडून त्यावाटे ऑफीसमध्ये प्रवेश करून, ऑफीस मध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरीतील २७ लाख ५० हजाराची रक्कम चोरून आरोपींची पलायन केले. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कापूरबावडी पोलिसांनी लुटीचा गुन्हा अज्ञात आरोपींच्या विरोधात दाखल करून तपास सुरु केला.

पोलिसांनी पेट्रोल पंप आणि आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता आरोपी चेहरे मास्क लावुन व टोपी घालून झाकलेले तसेच त्यांनी जॅकेट घातलेले असल्याने त्यांचेबद्दल माहिती मिळणे कठीण झाले होते. पेट्रोलपंपावरील हा दरोडा नियोजित आणि नियोजनबद्ध असल्याचे तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम सोनवणे सो, यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला मार्गदर्शन करून तीन पथकांनी तब्बल ३५ सीसीटीव्ही पुटेजची बारकाईने तपासणी केली. घटनास्थळी पंपाचे लॉक हे चवीने उघडल्याचा अंदाज पोलिसांना आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचारी आणि काम सोडून गेलेल्या कर्मचारी यांची सखोल चौकशी केली. त्यापैकी सोडून गेलेला कर्मचारी नयन पवार हा पैशाबाबत लालची व गुन्हेगारी वृत्तीचा असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. तसेच घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमधील आरोपीतांपैकी एका इसमाची व नयन पवार याची शरीरयष्टी मध्ये साधर्म्य दिसुन आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याची इथंभूत माहिती मिळवली. तो नवीमुंबई दिघा येथे तर वडील हे मुंबई सायं येथे कमला असलयाचे समोर आले.

हे देखील पहा-

त्याचा शोध घेतल्यानंतर तो सध्या सांगली येथे त्याचे मुळगावी असल्याबाबत समजले. पोलीस पथकाने पहाटेच्या सुमारास त्याचे राहते घर मु. पो. खेराडीवांगी, ता. कडेगांव, जि. सांगली येथुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे ओळखीचे गावाकडील तीन साथीदार व पेट्रोलपंपावर काम करणारा त्याचा मित्र यांना मदतीस घेवुन चोरी करण्याची नियोजनबद्ध आखणी करून सदरची चोरी केल्याचे सांगितले. तसेच मित्र विनोद कदम भास्कर सावंत आणि पेट्रोलपंपावर कामास असलेला रिलेश मांडवकर यांच्याबाबत माहिती दिली.

विनोद कदम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. अखेर चौकशीत आरोपी विनोद कदम याला सातारा येथून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन सहकारी यांची नावे सांगितली. पोलीस पथक जवन पवार व विनोद कदम याना घेऊन आरोपी मारकर सावंत व सुधाकर मोहिते यांच्या पर्यंत पोहचले. दोघांना सांगली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोलपंपावर कमला असलेल्या रिलेश मांडवकर याला अटक केली. पोलिसांनी दरोड्या प्रकरणी जयन महादेव पवार(२०) रा. मु.पो. खेराडवांगी, ता. कडेगांव, जि. सांगली हा पूर्वी पेट्रोलपंपावर काम करीत होता. रिलेशचंद्रकांत मांडवकर (२९) नोकरी, (पेट्रोलपंप ) रा. रूम नं ३०२, कृष्णा टॉवर, काठमुख रा. मु. पो. पहूर, ता. महाड, जि. रायगडच्या पेट्रोलपंपावर काम करीत होता. आरोपी सुधाकर अशोक मोहिते, वय ३४ वर्षे पैदा गवंडीकाम, रा. फोतीय मु.पो.ता.जि. सांगली, आरोपी विनोद गुलाम कदम वय २६ वर्षे चंदा चालक, रा. पांढरवाडी, मु. पो. विसापुर, ता. खटाव जि. सातारा आणि भास्कर उर्फ संभाजी दादास सावंत, (२७ ) नौकरी झोमॅटो, रा. मु. पो. कोतीच, ता. कडेगांव, जि. सांगली रा. माणदेवी मंदीर, फेज ३. शितळाई कॉम्प्लेक्स, रूम नं ०७. येथे आहे. अटक पाचही आरोपीना अटक करून न्यायालयात नेले असता त्यांना ११ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सुधाकर मोहित याने महाराष्ट्र तसेच कनाटक राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे तसेच विनोद कदम व भास्कर सावंत हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पण झाले व त्यांचेवरसुद्धा अशाच प्रकारचे आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपी यांचेकडे हयातील चोरी केलेल्या रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांनी लुटीची रक्कम विनोद कदम यांच्याकडे दिल्याचे समोर आले. पोलिसांनी लुटींपैकी १५ लाख २०० रुपये हस्तगत केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पीएम मोदींची पुण्यात सभा, चारही उमेदवार राहणार उपस्थित

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

Sahil Khan arrests in Mahadev betting app case | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

SCROLL FOR NEXT