आघाडीत बिघाडी! रायगडात राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना हटवण्यासाठी शिवसेनेचे तीनही आमदार आक्रमक

कामाचे श्रेय लाटण्याचा पालकमंत्र्यावर आमदार गोगावलेचा आरोप
भरत गोगावले यांची पत्रकार परिषद
भरत गोगावले यांची पत्रकार परिषदराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना हे राज्यातील आघाडीमधील प्रमुख पक्षामध्ये बिघाडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. दोन्ही पक्षात टोकाचे मतभेद झाले असून रायगडचा (Raigad) पालकमंत्रीच बदलावा असा पावित्रा शिवसेनेच्या (Shivsena) जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी घेतला आहे. यासाठी तिन्ही आमदार एकवटले आहेत. याबाबत आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

आज जिल्ह्यात नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक झाल्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथे पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन आमदार विजयी झाले. मात्र असे असताना जिल्ह्यात एकमेव आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना पालकमंत्री पद देण्यात आले. (Raigad News In Marathi)

भरत गोगावले यांची पत्रकार परिषद
Hingan Ghat Burnt Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा!

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्यात सत्तेवर बसली. मात्र जिल्ह्यात पालकमंत्री अदिती तटकरे ह्या पालकमंत्री असताना मनमानी कारभार करीत आहेत. घटक पक्षांना विश्वासात घेत नाहीत. असा आरोप आमदार गोगावले यांनी केला आहे. त्यामुळे अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवून शिवसेनेचा कोणीही पालकमंत्री द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेनेचे तीनही आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. अलिबागचे (Alibaug) आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील आपल्या सोबत असल्याचा दावा आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. (Raigad Politics Update)

हे देखील पहा-

आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे यावरून दिसू लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातील संघर्ष हा शिगेला पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com