सुरेंद्र रामटेके
वर्धा: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी दोषी विकेश नगराळेच्या शिक्षेचा निकाल आज लागला आहे. आज न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाबद्दल युक्तीवाद करण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेच्या प्रमाणाबद्दल युक्तीवाद करताना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली होती. तर बचाव पक्षाने या प्रकरणी तपास नीट झालेला नसून दोषीला कमीत- कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. तसेच दोषी विकेश नगराळेचे आई- वडील म्हातारे आहेत. तसेच त्याला एक लहान मुलगी देखील आहे. यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीरता पाहता व समाजामध्ये पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्यास कोणी धजावू नये म्हणून, सरकारी पक्षाने आरोपीस कठोरात कठोर शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर अखेर न्यालयाने आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Wardha Vikesh Nagarale convicted in Hinganghat Burnt case Final Hearing)
हे देखील पहा-
काय आहे प्रकरण
एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला (teacher) जिवंत जाळण्यात आले होते. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. आज आरोपीवर असलेले सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्याला न्यायालयाच्या वतीने दोषी ठरवण्यात आले आहे. उद्या न्यायालय (Court) दोषीला शिक्षा सुनावणार निकाल देणार आहे. ३ फेब्रुवारी २०२० दिवशी आरोपी (Accused) विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले होते. १० फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. या प्रकरणी ४२६ पानांचे दोषारोपपत्र, ६४ सुनावणी, २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचे विषय म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला २ वर्ष पूर्ण होत असताना आज हा निकाल दिला जाणार आहे. (Wardha Vikesh Nagarale convicted in Hinganghat case)
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने (government) विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचा आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याने न्यायालयामध्ये त्याची सुनावणी झाली. त्यावेळी आपल्यावर असलेले आरोप (Allegations) खोटे असल्याचे आणि त्यांनी असे कोणते देखील जळीत हत्याकांडाचे कृत्य केले नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहे. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेले भक्कम पुरावे लक्षात घेता या प्रकरणात न्यायालय योग्य शिक्षा सुनावणार आहे, अशी अपेक्षा दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे.
३ फेब्रुवारी २०२० दिवशी हिंगणघाट येथे आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमामधून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवले होते. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारी २०२० दिवशी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळे विरोधामध्ये तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत २९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
दरम्यान, एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळले गेल्याने हिंगणघाट आणि ग्रामीण भागामध्ये वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मत देखील अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेवर महिला आणि मुलींच्या विषयी घरातून अनेक बंधने लादली गेल्याचे त्यांचे मत होते. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर राहण्याविषयी ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.