Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे पुण्यात पडसाद! राष्ट्रवादीचं कर्नाटक भाजपविरोधात आंदोलन

कर्नाटक राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता राज्यात देखील मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत.
Hijab Controversy
Hijab ControversySaam Tv
Published On

पुणे: कर्नाटक (karanataka) राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता राज्यात देखील मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत. यातच याचा विरोध म्हणून एकीकडे नाशिकच्या (Nashik) मालेगावमध्ये (Malegaon) मुस्लिम समाजाकडून (Muslim Community) हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. यावरून आज पुण्यात राष्ट्रवादीकडून (Ncp) भाजपविरोधामध्ये (Bjp) आंदोलन करण्यात येत आहे. हिंदू महासभेतर्फे भगवे वस्त्र परिधान करून रॅली (Rally) काढण्यात येत आहे. (Hijab case reverberates state NCP agitation against BJP)

कर्नाटकमध्ये मुस्लिम (Muslim) समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालनाऱ्या कर्नाटक (karanataka) भाजप सरकारचा निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा फुले वाड्यासमोर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी काही महिला भगिनी देशामधील विविध महिला परंपरांच्या वेशभूषेत बघायला मिळत आहे. हिंदू महासभेच्या महिलांनी भगवे वस्त्र घालून कसबा गणपती ते लाल महाल या परिसरात ही रॅली काढत आहेत.

हे देखील पहा-

राज्यामध्ये हिजाब आणि बुरखाधारी महिलांचे समर्थन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी हिंदू धर्मीयांकडून भगवे वस्त्र परिधान करून रॅली काढण्यात येत आहे. नाशिकच्या मालेगाव शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे. मंगळवारी 'जमियत उलेमा ए हिंद'च्या प्रमुख मौलांनाची बैठक आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी महिला मेळावा घेण्यात येऊन तेथे हिजाब आणि बुरखाधरी महिला येणार असून हिजाबचे समर्थन करण्यात येणार आहे.

Hijab Controversy
Nitesh Rane: नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज...(पहा व्हिडिओ)

हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला आहे. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये ६ मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यावरून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले होते, यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम १४ आणि २५ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून पुण्यात कसबा गणपती समोरुन मिरणवूक काढण्यात येत आहे. दरम्यान हिजाब ला जर सुशिक्षित महिला समर्थन करत असेल, तर हिंदू जास्त सुशिक्षित महिला पण हिंदुत्वकरिता भगव्याकरिता आक्रमक होण्याकरिता तयार आहेत. आमची मुले पण भगवे घालून कॉलेज ला जाणार मुस्लिम महिलांकडून जर हिजाब चे समर्थन होत असेल तर आम्ही देखील भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com