Measles Disease
Measles Disease Saam Tv
मुंबई/पुणे

Measles Disease : मुंबईत गोवरचा धोका वाढला! गोवंडीत सर्वाधिक रुग्ण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबईमध्ये झोपडपट्टी भागात गोवर आजाराचा धोका वाढला आहे. प्रसार झालेल्या भागात केंद्रीय पथकाने भेट देवून आढावा घेतला. जानेवारीपासून आतापर्यंत १०९ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ९ लाख १६ हजार ११९ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात ६१७ संशयित रुग्ण आहेत. मुंबईत (Mumbai) सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून आले आहेत. या विभागाला केंद्र सरकारने (Central Governmnet) नियुक्त केलेल्या ३ सदस्सीय टीमने शनिवारी भेट दिली अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई महापालिकेकडून उपाययोजना

महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. याच सोबत विविध ठिकाणी लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक संघटना सुद्धा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत.

मागील महिन्यात एका मुलाचा मृत्यू

मुंबईत गोवरमुळे मागील महिन्यात एका मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा गोवंडी येथील रफिक नगर येथील राहणार होता. त्यानंतर गेल्या चार दिवसात ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. हे ३ मृत्यू संशयित मृत्यू आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

गोवर आजाराची कारणे

गोवर हा आजार Paramyxovirus या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो. या विषाणूचे इन्फेक्शन झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कांत जी व्यक्ती येईल तिला सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते.

गोवर आजाराची लक्षणे

सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे, चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लालसर बारीक पुरळ उठतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT