Crime News : फेसबुक लाईव्हवर ग्रायंडर मशीनने चिरला स्वत:चा गळा; प्रेयसीमुळे घेतला टोकाचा निर्णय

प्रेयसीच्या लग्नामुळे नाराज झालेल्या तरुणाने आधी केलं फेसबुक लाईव्ह अन् नंतर ग्राइंडर मशिनने चिरला स्वतःचा गळा
Crime News
Crime NewsSaam Tv

महाराजगंज : 'प्रेमात लोक काहीही करायला तयार असतात असं म्हणतात. ते कोणत्याही थराला जातात, जीवही देतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील महाराजगंज भागात घडला आहे. प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने ग्राइंडर मशिनने गळा चिरल्याची घटना घडली आहे. (Uttar Pradesh Crime News)

महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर गावातील एक तरुण उदरनिर्वाहासाठी हैदराबादला (Hyderabad) गेला होता. त्याचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलीचे लग्न नुकतेच दुसऱ्या मुलासोबत ठरले होते. त्यामुळे तरुणीने फोनवर बोलणे बंद केले होते. यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने हैदराबाद येथून फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करत ग्राइंडर मशीनने स्वतःचा गळा चिरला. फेसबुक लाईव्हवर गळा चिरल्याची घटना पाहून एकच खळबळ उडाली. त्याच्या ओळखीच्या लोकांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

Crime News
लातुरात अग्नितांडव! फर्निचरच्या दुकानाला आग; १० लाखांचे नुकसान

तरुणाने फेसबुकवर इतरही अनेक पोस्ट टाकल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याच्या प्रेयसीचे फोटो आणि इतर मेसेज देखील आहेत. मंगळवारी शेवटच्या व्हिडीओमध्ये तरुण त्याच्या प्रेयसीला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलत ग्रायंडर मशीनने स्वत:चा गळा चिरताना दिसत आहे.

गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

कुटुंबाने त्याच्यासोबत हैदराबादमध्ये राहणाऱ्या मित्रांशी संपर्क साधला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले. जखमी तरुणाला हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नातेवाईकही उत्तर प्रदेशहून हैदराबादला पोहोचले आहेत. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पुरंदरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख उमेश कुमार यांनी सांगितलं आहे की, या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. तरुणाचे नातेवाईक हैदराबादला पोहोचले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com