Accident news saam tv
मुंबई/पुणे

Dahisar Accident: रिक्षाला आयशरची जोरदार धडक, चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू

भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने या रिक्षाला जोरदार धडक दिली.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या दहिसरमध्ये एका आयशर गाडी आणि रिक्षाच्या धडकेत बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयशर गाडी चालकाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. त्यानंतर गाडी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दहिसर पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत (Rikshaw And Eicher Vehicle Accident 2 Siblings Died In Dahisar).

दहिसर (Dahisar) परिसरात गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास प्रवेंद्रकुमार गुप्ता हे पत्नी आणि दोन मुलांसह रिक्षातून दहिसर हायवेने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने या रिक्षाला जोरदार धडक (Accident) दिली. ही धडक इतकी जबर होती की यामध्ये प्रवेंद्रकुमार गुप्ता यांच्या दोन्ही मुलांना जबर मार लागला. त्यांना तात्काळ उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Accidental Death) झाला.

या अपघातात प्रवेंद्रकुमार गुप्ता यांचा 6 वर्षांचा मुलगा आकाश आणि 9 वर्षांची मुलगी आशिकाचा मृत्यू झालाय. तर, आरोपी आयशार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

Brinjal Dishes : वांग्याच्या ५ सोप्या अन् चविष्ट रेसिपी, आताच नोट करा साहित्य-कृती

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT