फायनान्स कंपन्यांकडून रिक्षा चालकांना मानसिक त्रास saam tv
मुंबई/पुणे

फायनान्स कंपन्यांकडून रिक्षा चालकांना मानसिक त्रास

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांचे उत्पन्न बंद असल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे : कोरोनामुळे (Covid 19) लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांचे उत्पन्न बंद असल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. शासनाला विविध कर रूपात करोडो रुपयांचे उत्पादन देणारे रिक्षाचालक (Rickshaw puller) अक्षरशः रस्त्यावर आले. त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने रिक्षाचालकांना तुटपुंजी रु १५०० ची आर्थिक मदत (Financial aid) जाहीर केली. या आर्थिक मदतीचा हेतु हा रिक्षाचालकांची आणि कुटुंबीयांची उपासमार चालू असताना त्या काळात त्यांना थोडाफार दिलासा भेटावा हा होता, पण त्याऐवजी शासनामार्फत दिलेले पंधराशे रुपये रिक्षाचालकांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होताच त्यांच्या बँक खात्यातून या फायनान्स कंपन्या परस्पररित्या ती रक्कम वळती करून घेत आहेत. (Rickshaw drivers are being harassed by finance companies)

तुम्ही दिलेली मदत ही रिक्षाचालकांपर्यंत न पोहोचता फायनान्स कंपन्यांच्या खिशामध्ये जात आहे. अशी माहिती पुण्याच्या बघतोय रिक्षावाला फोरमचे (Baghtoy rickshaw forum) अध्यक्ष केशव क्षीरसागर (Keshav Kshirsagar0 यांनी दिली आहे.

विओ शेतकरी बांधव किंवा इतरांना अनुदान देताना अशी तरतूद केली जाते कि शासनाकडून आलेले पैसे हे अनुदान दिलेल्या लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहचावे आणि ते परस्पर विमा कंपन्या व फायनान्स कंपन्यांनी कट करू नये. परंतु रिक्षाचालकांचे बाबतीत अशा कुठल्याही प्रकारची तरतूद न केल्यामुळे शासनाने दिलेले जवळपास एकशे सात करोड रुपये हे फायनान्स कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी दिले आहेत का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.

आपण त्वरित या विषयाची दखल घेऊन रिक्षाचालकांचे अकाउंट मधील पैसे ज्या फायनान्स कंपन्यांनी परस्पर कट केले आहेत त्यांना माघारी देण्यास सांगावे तसेच पुन्हा अशाप्रकारे पैसे कट होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. या व्यतिरिक्त फायनान्स कंपन्यांची विशेषतः बजाज फायनान्स कंपनीची रिक्शाचालकांवरती होणारी गुंडागर्दी ही दिवसेंदिवस वाढत असून, आज इतक्या वेळेस शासनाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा अशी कुठलीही दखल घेतली गेली नाही असे दिसत नाही.

या फायनान्स कंपन्या रिक्षाचालकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत असून, त्यांचा विविध प्रकारे मानसिक आणि आर्थिक छळ करत आहेत व रिक्षाचालकांना जेरीस आणत आहेत. रिक्षाचालकांना वसुलीसाठी फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, गुंडागर्दी करून रिक्षाचालकांच्या घरी येऊन त्यांची रिक्षा घेऊन जाणे व घरच्यांवर दहशत पसरवणे असे अनेक प्रकार फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट संपूर्ण महाराष्ट्रभर करत असून, रिक्षाचालकांच्या तक्रारीची दखल पोलीस चौक्यांमध्ये घेतली जात नाही. हा विषय आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही असे सांगून रिक्षाचालकांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. कृपया या गोष्टींची दखल घेऊन फायनान्स कंपन्यांना वसुली करताना ती कायदेशीर पद्धतीनेच करावी यासाठी आपण सक्त ताकीद द्यावी अन्यथा आम्हाला या दडपशाही विरोधात उग्र आंदोलन छेडावे लागेल.

तसेच रिक्षाचालकांचे इतर अनेक प्रश्न, गेले अनेक वर्ष सोडवले गेले नाहीत त्वरित दखल घ्यावी, या मागण्यांसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना कट झालेल्या रकमेचे पैसे परत।मिळावे यासाठी आतापर्यंत कट झालेल्या रिक्षा चालकांच्या रकमेचे चेक सुपूर्द करण्यात आले. असेही केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT