retirement of last ambassador car of central railway with car driver Saam Tv
मुंबई/पुणे

Ambassador Car: रेल्वेतील शेवटच्या अ‍ॅम्बेसेडर कारसह चालकाची ढोल-ताशांच्या गजरात सेवानिवृत्ती

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एकेकाळी मंत्री, सरकारी अधिकारी, कार्यलयांमध्ये वापरात असलेली अ‍ॅम्बेसेडर कार आता कालबाह्य झाली आहे. त्याजागी आता नव्या पद्धतीच्या आधुनिक गाड्यांनी या अ‍ॅम्बेसेडर गाड्यांची जागा घेतलीय. रेल्वे विभागात (Railway Department) देखील अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी अ‍ॅम्बेसेडर कार (Ambassador Car) वापरल्या जात होत्या. पण रेल्वेच्या मुंबई विभागातून शेवटची अ‍ॅम्बेसेडर कार काल (२९ मार्च, मंगळवारी) निवृत्त (Retired) झालीय. या कारला कर्मचाऱ्यांनी काल ढोल, ताशा, पेढे वाटून, फुलांची उधळण करत आणि परंपरेनुसार अधिकाऱ्यांनी गाडी रशीने ओढत गाडीला निरोप दिला.

हे देखील पहा -

या वाहनाला निरोप देण्यासाठी मुंबई मंडळातल्या अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. ही गाडी निवृत्त झाली, सोबतच विशेष बाब म्हणजे या गाडीचा चालकदेखील कालच निवृत्त झालाय, त्यामुळे या दोघांचा निरोप समारंभ एकत्र झाला. मुंबई मंडळाच्या या शेवटच्या अ‍ॅम्बेसेडर गाडीने ३५ वर्ष सेवा दिलीय. गाडी क्रमांक एमएफए - ७६५१ ही चारचाकी अ‍ॅम्बेसेडर गाडी २२ जानेवारी १९८५ ला रेल्वेचा सेवेत दाखल झाली होती. तेव्हा, या गाडीचे चालक मुतु पांडी आंडी नडार (Muthu Pandi Andi Nadar) हे होते.

तेव्हापासून मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकाच्या सेवेत अ‍ॅम्बेसेडर गाडी होती . ३५ वर्षांच्या सेवेत आतापर्यत १६ वाणिज्य व्यवस्थापकांनी या गाडीतून प्रवास केला आहे. विशेष म्हणजे या शेवटच्या अ‍ॅम्बेसेडर गाडीचे चालक गेली ३५ वर्ष मुतु पांडी आंडी नडार हेच आहेत त्यामुळे त्यांचं या गाडीसोबत एक प्रकारचं भावनिक नातं जुळलं होतं. आज एकाच दिवशी कार आणि चालक सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्यासाठी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हा एक भावनिक क्षण होता.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT