Pune: एलॉन मस्कचा पुणेरी मित्र कोण?

Elon Musk's Indian Friend: पुण्याच्या या तरुणाची एलॉन मस्कशी आहे खास मैत्री...
Meet Elon Musk's Puneri friend...
Meet Elon Musk's Puneri friend...Saam Tv
Published On

पुणे: पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं. सर्वच क्षेत्रात काहीतरी हटके करण्यात ही पुणेकर मागे राहत नाहीत. याचीच प्रचिती एका गोष्टींवरुन आलीय. पुण्यातील एक तरुणाची (Puneri Boy) मैत्री (Friendship) झाली आहे ते थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याशी. आश्चर्य वाटलं ना? तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? पण हो हे खरं आहे... (Meet Elon Musk's Puneri friend...)

हे देखील पहा -

पुण्यातील पिंपळे सौदागर भागात राहणारा प्रणय पाटोळे (Pranay Patole) या तरुणाने हे शक्य करून दाखवलं आहे. प्रणय एका नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय. तशी ही गोष्ट आहे ४ वर्षांपूर्वीची. प्रणयने एक ट्विट केलं होतं आणि चक्क एलॉन मस्कने त्याला रिप्लाय दिला आणि तेव्हापासून त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. 51 वर्षांच्या एलॉन मस्क आणि जवळपास 80 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलणं म्हणजे प्रणव स्वतःचं भाग्य समजतो. कशी झाली ओळख काय गप्पा ते एकमेकांशी मारतात ते ऐकुया प्रणयकडून...

२०१८ मध्ये पहिल्यांदा एलॉन मस्क यांनी प्रणयला रिप्लाय दिला. नंतर प्रणयने एलॉन यांना सतत फॉलो केलं. नंतर त्यांच्यात टेक्नॉलॉजीबद्दल अनेकदा चर्चा झाल्या. प्रणय सांगतो की, एलॉन यांच्याशी चर्चा करताना असं वाटतं की, आपण आपल्या मित्राशी बोलतोय. ते खूपच फ्रेंडली आणि खरे आहेत. त्याच्यासोबत बोलताना मजा येते, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आता मला मशीन लर्निंग आणि एआय (Artificial Intelligence) यामध्ये मास्टर्स करायचं आहे, शिकायचं आहे. त्यासाठी अमेरिकेला जायचं आहे. तिकडे जाऊन एलॉन यांना प्रत्यक्ष भेटायटचं आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचं आहे असं प्रणयचं स्वप्न आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com