पंढरपूर : कास पठार पाहण्याच्या निमित्ताने फिरण्यासाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील कारूंडे गावाजवळ कार आणि टेम्पोचा समोसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
लासुर्णे येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना फिरण्याच्या निमित्ताने कारमधून साताराकडे निघाले होते. सर्व कामगारांना कास पठार पाहण्यासाठी शहा हे कार घेऊन निघाले असताना पहाटेच हा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार (Accident) धडक झाली. यात कारचा समोरचा भाग संपूर्णपणे दाबला गेला आहे. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिक लागलीच मदतीला धावले.
चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर
या भीषण अपघातामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेश शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेले इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील कामगार असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.