Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Ambernath: टेम्पोच्या धडकेत नौदल निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद; फरार आरोपी अटकेत

Ambernath Accident Hit and Run Case: अंबरनाथमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याला एका टेम्पो चालकाने धडक दिली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. फरार आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

Bhagyashree Kamble

अजय दुधाणे, साम टीव्ही

अंबरनाथमध्ये एका भीषण अपघाताची घटना घडली होती. एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने सायकलस्वार निवृ्त्त अधिकाऱ्याला उडवलं. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात घडल्यानंतर टेम्पो ड्रायव्हर फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करत फरार टेम्पोचालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक केली आहे. तसेच टेम्पोही जप्त केला आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या लादी नाका परिसरातील अंबर केअर हॉस्पिटलसमोर एक भीषण अपघात घडला. १५ मार्च रोजी नौदलातून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी शिवप्रसाद गौड हे सायकलिंगसाठी घरातून निघाले होते. फॉरेस्ट नाक्याहून अंबर केअर हॉस्पिटलसमोर जात असताना त्यांच्या सायकलच्या मागे भरधाव वेगाने टेम्पो आली.

भरधाव टेम्पोने आधी त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांनाही या टेम्पोने धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाप्रसाद गौड यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी फरार टेम्पोचालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक केली. तसेच टेम्पोही जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT