Eknath Shinde on Kunal Kamra: कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रया, 'कुणाची तरी सुपारी घेऊन...'

Kunal Kamra song controversy Eknath Shinde Reaction: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde and Kunal Kamra
Eknath ShindeSaam
Published On

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेवर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसैनिकांनी कामराचा सेट तोडला. कुणाल कामाराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे.

या प्रकरणात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं आहे. 'कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे'. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कुणाल कामराने सादर केलेल्या वादग्रस्त गाण्यावर उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच कुणाल कामरा प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठिक आहे. पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर, हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम सुरू आहे', असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

Eknath Shinde and Kunal Kamra
Shocking Crime: मुलाने सावत्र आईला प्रियकरासोबत 'नको त्या' अवस्थेत पाहिलं, दोघांनी मिळून चिमुकल्याला संपवलं; पुढे जे घडलं

'या माणसाने सरन्यायाधीश, पंतप्रधान, निर्मला सीतारमण, उद्योगपतींबद्दल काय बोलला आहे, ते आधी पाहा. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे. मी याविषयावर बोललो नाहीये आणि बोलणारही नाही', असं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

'तोडफोडीचं समर्थन मी कधीच केलेलं नाही. पण समोरच्या व्यक्तीवर आरोप करताना कुठल्या लेव्हलला आरोप करायचं ते तरी पाहिलं पाहिजे', असंही शिंदे म्हणालेत.

Eknath Shinde and Kunal Kamra
Kunal Kamra: भरमसाठ शिव्या, थेट आव्हान; शिवसैनिक आणि कुणाल कामराचा संभाषणाचा ऑडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का?

पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, 'मला पदाचा मोह नाही. जेव्हा बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केली. तेव्हा आम्ही सत्ता सोडली. मी मंत्री होतो, माझ्यासोबत ८ मंत्री होते. त्यानंतर मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलो. आमचं भांडण खुर्चीसाठी नाही. आमचा खरा संघर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं यासाठी आहे. काम करणाऱ्याला पदाचा मोह नसतो', अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com