Flag hoisting by cm uddhav thackeray at varsha bungalow for Republic Day
Flag hoisting by cm uddhav thackeray at varsha bungalow for Republic Day रामनाथ दवणे
मुंबई/पुणे

Republic Day 2022: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतीय प्रजासत्ताकाच्या (Republic Day) वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते तब्बल अडीच महिन्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात प्रत्यक्षपणे उपस्थित राहणार आहे. १२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिसीद्वारे (Video Conference) बैठका आणि कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. (Republic Day 2022: Flag hoisting by Chief Minister Uddhav Thackeray at Varsha Niwas)

हे देखील पहा -

मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं होतं. "मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं होतं. अखेर आज अडीच महिन्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमांत ते प्रत्यक्ष दाखल होणार आहे. त्यामुळे ते आज काय बोलणार याकडे सर्वांचचं लक्ष लागलेलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT