Mega Block Google
मुंबई/पुणे

Mega Block: रविवारी हार्बर मार्गावर प्रवाशांसाठी दिलासा, मात्र मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

Mega Block On Central Line: मध्य रेल्वे मुंबई विभागात रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल, पण हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक लागू होणार नाही.

Dhanshri Shintre

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर यावेळी मेगा ब्लॉक लागू होणार नाही. मध्य रेल्वे, मुंबई विभागाद्वारे उपनगरीय विभागांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. प्रवाशांना थोडेसे असुविधा होऊ शकते, तरीही संबंधित कामांच्या पूर्णतेनंतर रेल्वेसेवा सुरळीत सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

तपशील पुढीलप्रमाणे आहे..

माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा सकाळी १०.५८ ते ३.१० वाजेपर्यंत माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. या सेवांना त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून १५ मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथून अप धीम्या मार्गावर वळविल्या जातील, ज्यामुळे मुलुंड आणि माटुंगा दरम्यानच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. माटुंगा स्थानकावर या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवून त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटांनी पोहोचतील. यामुळे प्रवाशांना थोडा उशीर होईल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. प्रवाशांना होणाऱ्या अडचणींसाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्याची विनंती केली आहे. यामुळे, रेल्वे प्रशासनाने कामांची पारदर्शक माहिती दिली असून, त्यांना होणाऱ्या असुविधेसाठी माफी मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

SCROLL FOR NEXT