Mumbai Metro  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबईकारांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा मेट्रो होणार ६ डब्यांची, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; काय आहे प्लान?

Ghatkopar To Varsova Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास लवकरच गर्दी मुक्त होणार आहे. या मार्गावर ४ ऐवजी ६ डब्यांची मेट्रो धावणार आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई मेट्रो १ मार्गावरील सर्व गाड्या सहा डब्यांच्या होणार

  • ३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू

  • सध्या मेट्रो-१ वर ४ डब्यांच्या १६ गाड्या धावतात

  • ६ डबे झाल्यानंतर प्रवासी क्षमता २,२५० होणार आहे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांचा मेट्रो प्रवास गर्दीमुक्त होणार आहे. घाटकोपर- वर्सोवा मेट्रो सहा डब्यांची होणार आहे. मेट्रो १ साठी ३२ अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो- वनने त्यासाठी ही निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे असून येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या घाटकोपर- वर्सोवा या मेट्रो मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त आहे. ही प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशांकडून मेट्रो प्रवासाला मिळाणारा प्रतिसाद आणि वाढती गर्दी लक्षात घेता आता मुंबई मेट्रोने घाटकोपर- वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो- १ मार्गावर सध्या ४ डब्यांच्या १६ मेट्रो धावत आहेत. या सर्व मेट्रो ६ डब्यांच्या करण्यासाठी ३२ अतिरिक्त डबे लागणार आहेत.

मुंबई मेट्रो- १ ने मेट्रोच्या डब्यांची संख्या ६ करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. या ३२ अतिरिक्त डब्यांच्या खेरदीसाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला कंपनीने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हे ३२ अतिरिक्त डबे खरेदी केले जाणार आहे. जर ३२ डबे खरेदी झाले तर मुंबई मेट्रो १ मार्गावर चारऐवजी सहा डब्यांची मेट्रो धावेल.

मुंबई मेट्रो- १ मार्गावर धावणाऱ्या लोकल चारऐवजी सहा डब्यांची झाली तर प्रवाशांची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. आता सध्या धावणाऱ्या ४ डब्यांच्या मेट्रोमधून एकावेळी १,७५० प्रवाशांची वाहतूक केली जाते. जर मेट्रोच्या डब्यांची संख्या ६ झाल्यावर यामधून एकावेळी २,२५० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतील. त्यानुसार मेट्रो १ वरून दिवसाला १० लाख प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे मेट्रो- १ मार्गावरील गर्दी देखील कमी होण्यास मदत होईल.

सध्या मेट्रो- १च्या मार्गीचे लांबी ही ११.४ किलो मीटर इतकी आहे. या मेट्रो मार्गावर १२ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गावर सध्या दिवसाला १६ मेट्रो धावतात. दिवसाला या मार्गावर लोकलच्या ४८६ फेऱ्या होतात. या मार्गावरून गर्दीच्या वेळी धावणाऱ्या २ मेट्रो गाड्यांमधील वेळ ३.२० मिनिटं इतका आहे. तर इतर वेळी दोन मेट्रोमधील वेळ ६ मिनिटं असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तुडूंब पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली; २ मुली बुडाल्या

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकर्सची पसंती, नाशिकमधील 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Bigg Boss 19-Pranit More : मालतीसोबतच्या भांडणावर प्रणित मोरेची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT