Metro Train : मेट्रोतून प्रवास करताना चुकूनही झोपू नका, नाहीतर भरावा लागेल हजारोंचा दंड

Metro News : मेट्रोमध्ये झोपणे किंवा जमिनीवर बसणे यामुळे मोठा दंड आकारला जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने ही कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
Metro Train : मेट्रोतून प्रवास करताना चुकूनही झोपू नका, नाहीतर भरावा लागेल हजारोंचा दंड
Metro NewsSaam Tv
Published On
Summary
  • दुबई मेट्रोमध्ये प्रवाशांनी झोपल्यास किंवा जमिनीवर बसल्यास दंड आकारला जाणार

  • सोशल मीडियावर व्हायरल पोस्टनंतर RTA ने कारवाईचा निर्णय घेतला

  • प्रवाशांना प्रवासादरम्यान शिस्तबद्ध राहण्याचे आवाहन

  • मेट्रोमध्ये इतरांना त्रास होईल असे वर्तन केल्यास कारवाई

लोकल प्रमाणे आता मेट्रोमध्येही प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत आहे. प्रवासी प्रवास काळात वेळ जाण्यासाठी गाणी बोलतात, काही मोबाईलमध्ये काम करतात तर काही फावल्या वेळेत आपली झोप पूर्ण करतात. मात्र आता मेट्रोमध्ये झोप काढली तर खिशाला भुर्दंड बसणार आहे. मेट्रोत जमिनीवर बसणे किंवा सीटवर झोपणे प्रवाशांना चांगलेच महागात पडणार आहे. असे दुबईतील रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये एका नेटकऱ्याने मेट्रो मधला फोटो शेअर करत म्हटलं आहे की, लोक मेट्रोमध्ये कसेही बसतात. शिवाय ते बसल्या बसल्या झोपतात. काहीजण मेट्रोमध्ये जमिनीवर बसतात. यामुळे इतर प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक त्रास होतात.

Metro Train : मेट्रोतून प्रवास करताना चुकूनही झोपू नका, नाहीतर भरावा लागेल हजारोंचा दंड
Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

याचा परिणाम अनेकदा कामावर होतो. हि चिंताजनक बाब असल्याचं या नेटकऱ्याने म्हटलं. दुबईमधील या तरुणाच्या पोस्टनंतर देशातील रस्ते आणि वाहतूक प्राधिकरण खडबडून जागे झाले. यानंतर दुबई मेट्रोने अशा प्रवाशांना कडाडून इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मेट्रोमध्ये प्रवाशांनी बसून झोपू नये.

Metro Train : मेट्रोतून प्रवास करताना चुकूनही झोपू नका, नाहीतर भरावा लागेल हजारोंचा दंड
Crime News : संभाजीनगर हादरलं! शाळेच्या मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

तसेच बसल्या जागी स्थिर बसावे आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. शिवाय मेट्रोमध्ये खाली जमिनीवर बसू नये. ज्यामुळे इतरांना अडचणी निर्माण होतील. असे निदर्शनास आल्यास संबंधित प्रवाशांवर कारवाई केली जाणार असल्याचं दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने म्हटलं आहे. त्यामुळे आता मेट्रोमध्ये डुलकी काढला तर मोठा अनर्थ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com