Mumbai Auto-Taxi Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Auto-Taxi: भाडं नाकारणं मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांना पडणार महागात, आता थेट परवानाच होणार रद्द

Mumbai Police: यापुढे भाडं नाकारणाऱ्या या चालकांविरोधात कडक कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे.

Priya More

Mumbai News: मुंबईमध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालकांची (Mumbau Auto-Taxi Driver) मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे टॅक्सी आणि रिक्षा चालक सर्रासपणे भाडे नाकारतात त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. आता या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडं नाकारणं महागात पडणार आहे. कारण मुंबई पोलिस (Mumbai Police) याबाबत मोठं पाऊल उचलत असून नवीन आदेश जारी करणार आहे. यापुढे भाडं नाकारणाऱ्या या चालकांविरोधात कडक कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे.

मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात आता मुंबई पोलिस (Mumbai Traffic Police) कडक कारवाई करणार आहेत. ऑटो किंवा टॅक्सीमध्ये बसण्यास प्रवाशाला नकार देणाऱ्या चालकांचे परवाने रद्द किंवा निलंबित केले जाणार आहेत. बेकायदा रिक्षाचालकांविरोधात पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. हे मुजोर रिक्षा-टॅक्सी चालक प्रवाशांना गाडीत बसण्यास नकार देतात. तसंच ते बॅच आणि गणवेश देखील घालत नाहीत, कमी अंतरासाठी जास्त शुल्क आकारतात, विहित संख्येपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुंबई पोलिस पुढील आठवड्यापासून विशेष मोहीम राबवत आहेत.

वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकारी प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांजवळ बेकायदेशीरपणे वाहने पार्क करणाऱ्या, निर्धारित संख्येपेक्षा जास्त प्रवासी बसवणाऱ्या, दुहेरी पार्किंग करणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आरटीओला देण्यात आले आहेत.

मोटार वाहन कायद्याच्या कलम 179 अन्वये विहित संख्येपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बहुतांश चालक वांद्रे (पूर्व) आणि (पश्चिम), अंधेरी (पश्चिम), जुहू, सांताक्रूझ, कांदिवली (पूर्व) आणि मानखुर्द येथील आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बोरिवली आणि वांद्रे परिसरात गेल्या आठवड्यात वाहतूक पोलिसांनी 257 वाहनचालकांवर कारवाई केली होती. यापैकी 221 ऑटोचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर 170 ऑटोचालकांना प्रवाशांना इच्छितस्थळी न नेल्याने आणि ऑटोमधून नेण्यास नकार दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT