
Pardeep Kurulkar News: हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुणे सत्र कोर्टाने १५ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. कुरुलकर यांची रवानगी आता कोठडीत होणार आहे. (Latest Marathi News)
डीआरडओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची आज एटीएस कोठडी संपली होती. त्यानंतर आज त्यांना पुणे सत्र कोर्टात हजर केले होते. यावेळी कुरुलकर यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली.
कुरुलकर यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, या प्रकरणाचा तपास २४-२-२३ पासूनच सुरु झाला होता. तर १८-४-२३ रोजी संपर्क साधण्याचे साधने जप्त केले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासूनच तपास सुरू आहे.
'तक्रारीत विरोधाभास आहे. यात संवेदनशील माहिती आहे असं म्हणलं आहे. ही माहिती काय हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्याची सदर माहिती का स्पष्ट करण्यात आली नाही, याबाबत देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे वकील म्हटले.
डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे वकील पुढे म्हणाले, 'इतक्या प्रथमदर्शनी टप्प्याला अटक आणि आरोपीला कस्टडी गरजेची नाही. या प्रकरणात पैसे घेतले याचा काही पुरावा नाही. खासगी पासपोर्ट वापरायचा असेल तर पुरावे कोणी पैसे दिले याचे द्यावे लागतात. शासकीय पासपोर्ट वापरण्यासाठी कोण कुठे गेले याची नोंद असते. सरकारच त्याचे आदेश देते, असेही ते पुढे म्हणाले .
'पीआयओने भारतीय क्रमांकावरून ब्लॉक केले, असा मेसेज केला. तो रिकव्हर करायचा आहे असे म्हटले जात आहे. पण तो कुरुलकर यांनीच ब्लॉक केला आहे. तो पुरावा कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांच्या वकिलांनी कोर्टात विचारला.
'तर डीआरडओ गेस्ट हाऊसमध्ये महिलांना भेटल्याची माहिती अजून उपलब्ध नाही. आधी ८ वस्तू म्हणाले, आज मोबाईल ही ९ वी वस्तू आली, असेही त्यांनी कोर्टात सांगितले.
तर कुरुलकर यांना दोन पासपोर्टबाबत विचारणा केल्यानंतर सांगितले की, 'शासकीय पासपोर्टवरून भेटायचा कालावधी ७-८ दिवसांचा असतो. तर २०१९ नंतर वैयक्तिक पासपोर्ट वापरून कुठेही गेलो नाही. हे नोंदीवरून दिसून येईल, असे कुरुलकर यांनी कोर्टात सांगितले.
दरम्यान, एटीएसने आज कोर्टात महत्वाचे मुद्दे मांडले. एटीएसला न्यायालयासंबंधीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात एक जीमेल आयडी मिळाला. तर हा जीमेल आयडी पाकिस्तानचा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याशिवाय फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती चौकशीनंतर समोर आली आहे.
'कुरुलकर पाच ते सहा देशात गेले आहेत, त्याचा तपास करायचं आहे. बँक व्यवहार तपासायचे आहेत. याशिवाय त्यांनी एक PIO चा नंबर ब्लॉक केला त्याची स्पष्टता घ्यायची आहे. एक मोबाईल क्रमांक निष्पन्न झाला आहे, त्याचा तपास करायचा आहे, अशी माहिती देखील एटीएसने कोर्टात मांडली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.