Narendra Patil News: राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरता फिरता पूर्ण तवाच फिरवला. काही राष्ट्रवादीमधील मंडळी शिंदे गटात तर काही भाजपमध्ये सामील होणार होती अशी माहिती होती. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी खेळली, असं मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. (Latest Marathi News)
पुढे बोलताना ते म्हणाले, पवार हे या सगळ्या गोष्टीला तरबेज आहे. त्यांच्या नक्की मनात काय होतं तर मधल्या काही महिन्यांमध्ये अशी वार्ता सगळीकडे येत होती, की काही मंडळी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात सामील होणार आहे'.
'काही मंडळी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व बरोबर सामील होऊन काम करणार. या सगळ्या चर्चेत शरद पवार साहेबांनी खेळलेली चाल ही नक्की थांबवण्यासाठी होती का ? जाण्यासाठी होती ? का स्वतःसाठी होती ? हा प्रश्न त्यांना जास्त माहिती असेल', असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
'विरोधी पक्ष ज्यावेळेला महाविकास आघाडीच्या सत्तेवर असताना त्यांनी स्थैर्य याचिका दाखल केली होती. विरोधी पक्षाने त्यावेळेला थोडासा डोळ्यांमध्ये तेल टाकलं असतं आणि देवेंद्रजींनी दिलेला आरक्षणच टिकवण्यासाठी हृदयापासून प्रयत्न केला असता तर ही वेळ आली नसती, असे पाटील पुढे म्हणाले.
'क्युरीटी पिटीशन वरती जास्त बारकाईने लक्ष देत आहेत. त्याचबरोबर यासंदर्भामध्ये अजून एक जोड आम्ही देणार आहोत. परत एकदा पूर्ण राज्याचा एक दौरा करून आम्ही फेर सर्वेक्षण करणार आहोत. ज्यामध्ये काही त्रुटी जर असतील तर त्या त्रुटी त्या ठिकाणी दूर होती, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
'आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप चांगली भरारी घेतलेली आहे. 60 हजार मराठा समाजाच्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.