Karnataka Elections 2023 : भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री कन्नडीगांच्या प्रचाराला; विनायक राऊतांची शिंदेंवर टीका (पाहा व्हिडिओ)

महाविकास आघाडी हवी असेही विनायक राऊत यांनी नमूद केले.
mp vinayak raut, cm eknath shinde
mp vinayak raut, cm eknath shindesaam tv
Published On

Vinayak Raut News : कर्नाटकातून भाजपला बोऱ्या बिस्तरा उचलावा लागेल. कन्नडीगांच्या आवाज काढणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) होते पण आताचे मुख्यमंत्री (eknath shinde) आता कर्नाटकात भाजपच्या प्रचाराला जात आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे मत खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

mp vinayak raut, cm eknath shinde
Sharad Pawar News : अजित पवारांवर साहेब खूष... साता-यात म्हणाले, अजितदादा बघताहेत आनंद आहे (पाहा व्हिडिओ)

खासदार विनायक राऊत म्हणाले कर्नाटकातील निवडणुकीत (Karnataka Election 2023) मराठी माणसाला मतदान करा हा राज ठाकरे यांचा निर्णय़ चांगला आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कन्नडीकांच्या प्रचाराला जातात हे दुर्देव आहे. बीजेपी आणि आरएसएसच्या चिठ्ठीवर झालेल्या मुख्यमंत्री यांचे मुख्यमंत्री पद चालू आहे. भाजपच्या तालावर नाचणारे हे मुख्यमंत्री असल्याची बाेचरी टीका खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

mp vinayak raut, cm eknath shinde
Nana Patole News : सरकार किती घाबरतंय बघा, असं का म्हणाले नाना पटाेले ? (पाहा व्हिडिओ)

खासदार राऊत म्हणाले महाविकास आघाडी आम्हांला हवी म्हणजे हवी. देशातील हुकमी राजवट उलथून टाकायची असेल तर सर्वांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. नितिश कुमार त्यासाठीच मुंबईत येत आहेत.

वंचित यांच्याशी झालेली चर्चा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे. वंचित संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय़ होवू शकतो. पक्ष प्रमुखांच्यावर संशय घेवू नये, आम्ही काॅग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राधान्य देताे असेही राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com