Sharad Pawar News : अजित पवारांवर साहेब खूष... साता-यात म्हणाले, अजितदादा बघताहेत आनंद आहे (पाहा व्हिडिओ)

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज सातारा जिल्हा दाै-यावर आहेत.
sharad pawar, ajit pawar, satara, ncp, koregoan, shashikant shinde
sharad pawar, ajit pawar, satara, ncp, koregoan, shashikant shindesaam tv

Sharad Pawar In Satara : सत्ताधारी अधिकारी यांच्यावर प्रेशर टाकत आहेत. सातारा जिल्ह्यात देखील अशी परिस्थिती आहे असे अजित पवार यांनी साेमवारी काेरेगावच्या सभेत केले. याकडे तुम्ही कसं पाहता असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारताच त्यांनी विराेधी पक्ष नेत्यांना प्रशासनात काय सुरु आहे हे पक्के माहित असते. त्यामुळे त्यांनी भाष्य केले असेल म्हटलं. (Maharashtra News)

sharad pawar, ajit pawar, satara, ncp, koregoan, shashikant shinde
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंची कार्यपद्धत... खूद्द शरद पवारांनीच लिहलं आहे, आणखी काय हवं : दीपक केसरकर

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तसेच कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ व कोरेगाव तालुका खादी ग्रामउद्योग संस्थांमधील नवीन संचालकांचा सत्कार समारंभ साेमवारी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आयाेजित केला हाेता. या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे आेढले. त्याचा धागा पकडत शरद पवार यांना माध्यमांनी एक प्रश्न विचारला.

sharad pawar, ajit pawar, satara, ncp, koregoan, shashikant shinde
Maratha Vanvas Yatra सुरु, मराठा क्रांती ठोक माेर्चाने दर्शविला विराेध; तुळजापूरात तणाव

त्यावर शरद पवार म्हणाले अजितदादा हे विराेधी पक्ष नेते आहेत. विराेधी पक्ष नात्याने त्यांना प्रशासनात काय सुरु आहे हे त्यांना माहित असते. त्याच्यावर भाष्य करायची जबाबदारी त्यांच्यावर असते. ते ती निभावत आहेत.

मी काेरेगावत गेलेलाे नाही. शशिकांत शिंदे येथे आहेत. त्यांच्याशी अन्य मी बाेललाे परंतु काेरेगावच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. अजितदादा बघताहेत आनंद आहे असेही पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com