kalsubai shikhar Saam Tv
मुंबई/पुणे

kalsubai shikhar : कळसुबाई शिखरावर रेकॉर्डब्रेक गर्दी; अपघातांचा धोका

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराकडे पाहिलं जातं.

रोहिदास गाडगे

kalsubai shikhar News : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराकडे पाहिलं जातं. या शिखरावर ट्रेकरसह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून कळसुबाई शिखरावर रेकॉर्डब्रेक गर्दी होत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक प्रशासन, वनविभाग, पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

भिमाशंकर ते त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या आदिवासी समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या कळसुबाईला मोठ्या संख्येने भाविकांसह पर्यटक, ट्रेकर दाखल होत असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

याचा परिणाम शिखरावर चढाई करण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांवर पहायला मिळत आहे. शिखरावर असणाऱ्या पायऱ्यांवर खाली आणि वरच्या बाजूला एक किलोमीटर गर्दीचे लोट पहायला मिळत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT