Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Saam TV
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar : पुण्यात मतांसाठी पैसे वाटप...; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप, थेट उपोषणालाच बसले

Dnyaneshwar Choutmal

Ravindra Dhangekar : पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक दावे केले आहेत. निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांच वाटप केलं जात आहे. असा आरोप रविंद्र धांगेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. (Latest Ravindra Dhangekar News)

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विरोधकांवर असे आरोप केले आहेत. तसेच कसबा गणपती मंदिरासमोर थोड्याच वेळात ते उपोषण करणार आहेत. त्यामुळे कसबा गणपती मंदिराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरासमोर उपस्थित कार्यकर्त्यांच्या हातात असलेले पोस्टर्स आणि बॅनर पोलिसांनी काढून घेतले आहेत.

धंगेकर आणि त्यांच्या पत्नी घरातून चालत गणपती मंदिराकडे येत आहेत. दरम्यान निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांच वाटप असा फॉम्यूला तयार करण्यात आला आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मागच्या निवडणुकीत देखील हा प्रकार उघडकीस आला होता. सुरक्षितपणे पैशांचं वाटप कोण करू शकतं? तर पोलिसांची वाहने,असं राऊत म्हणाले.

'असा प्रकार या आधी पाच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. ज्यांनी आरोप केला असेल, तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. भाजपच्या कालखंडात पैसे वाटपाची उदाहरणे समोर आली आहेत. पोलीस पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटतात. हे पुराव्यासह उघड झालं आहे.रविंद्र धंगेकर आरोप करताहेत म्हणजे त्यांना पक्की माहिती असणार, असं देखील संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

SCROLL FOR NEXT