Pune Bypoll Election : पुणे पोटनिवणुकीत प्रचारासाठी शरद पवार मैदानात; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रयत्न करणार आहेत.
MNS vs NCP News, Raj Thackeray News, Sharad Pawar News, Latest Political News Updates
MNS vs NCP News, Raj Thackeray News, Sharad Pawar News, Latest Political News UpdatesSaam Tv

Pune Bypoll Election News : पुणे पोटनिवडणुकीसाठी पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वच जोरदार तयारी केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जोर लावण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार लवकरच मेळावे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर मनसेने या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला असला तरी प्रचारात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

पुणे पोटनिवडणुकीसाठी पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने या दोन्ही मतदारसंघात प्रचारासाठी दणक्यात सुरूवात केली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) पोटनिवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारासाठी मेळावे घेणार आहेत.

शरद पवार हे २२ फेब्रुवारी रोजी मेळावे घेणार आहेत. या मेळाव्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्याकडून सकाळी चिंचवड तर दुपारी कसबा मतदारसंघासाठी मेळावा घेण्यात येणार आहे.

मनसेची सावध भूमिका

मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आज चंद्रकात पाटील हे मनसेच्या कसबा विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

MNS vs NCP News, Raj Thackeray News, Sharad Pawar News, Latest Political News Updates
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..,

कसब्यात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले गणेश भोकरे यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. दुसरीकडे काल माजी खासदार संजय काकडे यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दीपक पायगूडे यांची भेट घेतली होती. पोटनिवणुकीत भाजपला राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जाहीर पाठिंबा दिला असला तरी प्रचारात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजप नेते मनसेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com