Ratan Tata Health Update : Saam tv
मुंबई/पुणे

Ratan Tata Health Update : रतन टाटांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरुच

Ratan Tata news : उद्योजक रतन टाटा यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .

Saam TV News

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रतन टाटा यांना मुंबईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तत्पूर्वी मागील सोमवारी रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आले होते. टाटा यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, हे वृत्त स्वतः टाटा यांनी फेटाळून लावले होते. हे वृत्त निराधार आहे, असे टाटा यांच्या एक्स हँडलवरून सांगण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी रतन टाटांनी केली होती पोस्ट

वयोपरत्वे काही वैद्यकीय चाचण्या करत आहे. चिंतेचे कुठलेही कारण नाही. मी अगदी ठणठणीत आहे, असे पोस्टद्वारे सांगतानाच कोणतीही चुकीची बातमी पसरवण्यात येऊ नये, असेही त्यांनी सांगितले होते.

रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून मार्च १९९१ पासून डिसेंबर २०१२ पर्यंत जबाबदारी सांभाळली. विदेशात शिक्षण घेतल्यानंतर टाटा पहिल्यांदाच टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा इंडस्ट्रीजमध्ये असिस्टंट म्हणून धुरा सांभाळली. त्यानंतर काही महिने त्यांनी जमशेदपूर येथील टाटाच्या प्रकल्पात प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण करतानाच, त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास सुरुवात केली. सन २००८ मध्ये रतन टाटा यांना भारत सरकारकडून देण्यात येणारा दुसरा सर्वात प्रतिष्ठेचा नागरी सन्मान पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

रतन टाटांची प्रकृती स्थिर

उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. रतन टाटा यांच्यावर ब्रिजकँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. 7 तारखेपासून रतन टाटा ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रतन टाटा यांची अँन्जिओग्राफी झाली. सध्या रतन टाटा यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT