Ratan Tata latest News in Marathi
Ratan Tata latest News in Marathi SAAM TV
मुंबई/पुणे

रतन टाटांनी पुन्हा हृदय जिंकलं; 'नॅनो'मधून आले ताज हॉटेलात, ना सिक्युरिटी गार्ड ना कसला थाट!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) नेहमीच आपल्या साधेपणामुळं चर्चेत असतात. त्यांच्या साध्या राहणीमानाचं कौतुक होतं. आता पुन्हा त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मुंबईत बुधवारी ते आपल्या टाटा नॅनो कारमधून ताज हॉटेलात पोहोचले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते नॅनो कारमधून येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या आजूबाजूला एकही सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसते. कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर शांतनू नायडू यांच्यासोबत एका कार्यक्रमासाठी आले होते.

दरम्यान, टाटा नॅनो ही कार जेव्हा बाजारात आली, त्यावेळी सर्वात स्वस्तातील, गरिबांना परवडणारी कार अशी तिची ओळख होती. पुढच्या १० वर्षांत नॅनो कारच्या विक्रीत मोठी घट झाली होती. त्यात मार्केटिंगमध्ये आलेले अपयश, सुरक्षिततेबाबतच्या बाबी आणि स्वस्त कारच्या मागणीत झालेली घट ही त्यामागील कारणे होती.

याच नॅनो कारमधून उद्योगपती रतन टाटा मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले. कोणताही डामडौल नाही. सेलिब्रिटी आले की त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, पोलीस यांचा मोठा फौजफाटा बघायला मिळतो. पण रतन टाटांसोबत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. त्यांचा हा साधेपणा सगळ्यांनाच भावला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 'आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे,' अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. तर एका यूजरनं महान व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT