Ajit Pawar With Rebel NCP MLAs Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis: गोव्यात किंवा कुठे हॅाटेल बुक करू का? सावलीसारख्या सोबत आलेल्या आमदारांना अजित पवारांची विचारणा

साम टिव्ही ब्युरो

Rashtrawadi Crisis: राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर अजित पवार गटाची बैठक आज मुंबईमधील एमईटी येथे पार पडली. या बैठकीत अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहे. हे चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईतील या बठकीनंतर अजित पवार गटातील आमदार एका लक्झरी बसमधून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बैठकीत काही आमदार भाऊक झाले होते. 'आम्ही तुमची साथ सोडणार नाही', असं म्हणत आणि लेकरा बाळांच्या शपथा घेऊन आमदारांनी अजित पवारांना खात्री दिल्याचं समजतं आहे.

यावेळी अजित पवार यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना गोव्यात किंवा कुठे हॅाटेल बुक करु का? अशी विचारणा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

तत्पूर्वी आज राष्ट्रवादीच्या आज दोन्ही पवारांनी पक्षातील नेते, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यातच आज बैठकीत कार्यकर्तांना संबोधित करताना अजित पवार यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटलं की, तुमचं वय झालंय, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''काल आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी गेले. ठिक आहे चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे दैवत आहे. माझ्याकडूनही घोडचूक झाली होती. मी तिथे सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत न पाणी पिता बसलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो आता वय 82 झालं, 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहा की नाही? तुम्ही आशिर्वाद द्या ना... आम्हाला वाटतं तुम्ही शतायुषीय व्हावं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT