Mumbai Mumbra Station News: मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत

Mumbra Station News: मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत
Mumbra Local Derail
Mumbra Local DerailSaam Tv
Published On

Mumbai Local News: मुंबई लोकल रेल्वे संबंधित एक बातमी समोर येत आहे. मुंब्रा स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लोकल ट्रेन उभी असल्याचे दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी ही या रेल्वेच्या बाजूला दिसत आहे. अशातच सीएसएमटीवरून टिटवाळ्याला जाणाऱ्या गाडीचा पहिला डबा रुळावरून घासल्याची अफवा पसरली आहे, मात्र हे खरं नसल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.

Mumbra Local Derail
Maharashtra Political Crisis: गोव्यात किंवा कुठे हॅाटेल बुक करू का? सावलीसारख्या सोबत आलेल्या आमदारांना अजित पवारांची विचारणा

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मध्य रेल्वेने ट्वीट केलं आहे की, "मुंब्रा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १- सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकल- प्लॅटफॉर्मच्या साईडला रेल्वेचा रेल्वेचा डबा घासल्यामुळे कर्मचार्‍यांनी रेल्वेची तपासणी केली. यात सगळं सामान्य आढळलं.''

यातच सोशल मीडियावर अनेक प्रवाशांनी रेल्वे लेट असल्याने ट्वीट करत तक्रार केली आहे. एका युजरने ट्वीट केले की, "मुंब्रा येथे एक तासाहून अधिक वेळ रेल्वे थांबली आहे.''  (Latest Marathi News)

Mumbra Local Derail
Sharad Pawar VS Ajit Pawar : सकाळी शरद पवारांसोबत असलेल्या आमदाराचा यू टर्न; अजित पवारांची भेट घेत जाहीर केला पाठिंबा

दरम्यान, आता रेल्वेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. असं असलं तरी अजूनही रेल्वे १० ते १५ मिनिट उशिरा धावत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com