रश्मी पुराणिक
Rashmi Shukla News : महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता,त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये 'क्लोजर रिपोर्ट' दाखल करण्यात आला आहे. त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (Phone Tapping Case)
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठपका ठेवल्यानंतरच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये दिल्यानंतर शुक्लाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
काय आहे फोन टॅपिंग प्रकरण ?
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता.
या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता.
काय होते उच्चस्तरीय समितीच्या अहवालात ?
शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करुन ते भाजपला पुरविले आरोप होता. तसेच तसेच शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही त्यांच्या पदाचा गैरवापर करून बेकायदा फोन टॅपिंगकेल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यानुसार पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू होता. याप्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती.
शुक्ला या पोलिस आयुक्त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची देखील चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आला होता.
शुक्ला सध्या हैद्राबाद येथे प्रतिनियुक्तीवर
रश्मी शुक्ला सध्या हैद्राबाद येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला या गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त असताना फोन टॅपिंग प्रकरण घडले होते. त्यापूर्वी त्या पुणे पोलिस आयुक्त असतानाही याच पद्धतीने त्यांनी काम केल्याचा ठपकाही अहवालामध्ये ठेवण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.