मुंबई/पुणे

Ranichi Baug: मुंबई महापालिकेकडून नागरिकांना दिवाळी भेट; भाऊबीजेच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली

Ranichi Baug: वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे बुधवारी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी खुले राहणार आहे.

Vishal Gangurde

Ranichi Baug :

मुंबईकरांचं आवडतं पर्यटनाचं ठिकाण म्हणजे राणीची बाग. मुंबईतील अनेक नागरिक सुटीच्या दिवशी हमखास भायखळ्यातील प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. याच मुंबईकरांसाठी मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे बुधवारी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी खुले राहणार आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालय आता बुधवार ऐवजी गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊबीजनिमित्त १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सार्वजनिक सुटी आहे. मात्र, तरीही बुधवारी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी म्हणजे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भायखळाच्या पूर्व भागात असणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, मुंबई महापालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते. त्याच ठरावानुसार त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.

तसेच या ठरावानुसार बुधवार म्हणजे १५ नोव्हेंबर २०२३ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT