Jayant Patil: चुकीचं प्रमाणपत्र व्हायरल करणारे तक्रारींना तोंड देतील; शरद पवार यांचा जातीचा दाखला व्हायरल करणाऱ्यांना जयंत पाटलांनी सुनावलं

Jayant Patil : शरद पवार यांचे जात प्रमाणपत्र व्हायरल करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले आहे.
jayant patil
jayant patil saam Tv
Published On

Jayant Patil on Sharad Pawar Caste Certificate:

राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला असून नेत्यांची जात काढली जात आहे. काल सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जात प्रमाणपत्र शेअर करण्यात आलं होतं. जात प्रमाणपत्र व्हायरल करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले आहेत. (Latest News)

राज्याच्या राजकारणात शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे आणि तो मराठा म्हणून आहे असे जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. व्हायरल झालेलं प्रमाणपत्र हे अत्यंत चुकीचं प्रमाणपत्र आहे. प्रसिद्धीसाठी काहीजण सोशल मीडियावर शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील लोकांमध्ये शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवणे. त्यांची बदमानी करणे, त्यांनी मागच्या काळात काय केलं असा चुकीचा प्रश्न विचारणं. त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र व्हायरल करणं हे पवार साहेबांना बदमान करण्याचं षडयंत्र आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय.

शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखल आहे, त्यात ‘मराठा’म्हणून उल्लेख असल्याचं जयंत पाटील म्हणालेत. दाखल्यावर काही लिहून व्हायरल केले जात आहेत. त्यावर शरद पवार यांचे कार्यकर्ते राज्यातील अनेक ठिकाणी तक्रारी त्याविरोधात दाखल करत आहेत. त्यामुळे चुकीचं पसरवणारे तक्रारींना तोंड देतील,असा इशारा जयंत पाटलांनी दिलाय.

जात प्रमाणपत्र व्हायरल होण्याविषयी सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय. हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. पवार दहावीला होते तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? आजकाल खोटी प्रमाणपत्रे बाजारामध्ये सर्रास मिळतात, असं त्या म्हणाल्या .

jayant patil
Baramati : काैटुंबिक कार्यक्रमात काका- पुतणे एकत्र येणार? पवारांच्या गोविंदबागेत पाडव्याची तयारी पूर्ण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com