Ramdas Kadam: 'पुत्रप्रेमासाठी किर्तीकरांची पक्षाशी गद्दारी; पितळ उघडे पडल्यामुळेच...' रामदास कदमांनी पुन्हा डिवचले!

Ramdas Kadam On Gajanan Kirtikar: गजानन किर्तीकरांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.
Ramdas Kadam
Ramdas KadamSaam TV
Published On

संजय गडदे, प्रतिनिधी

Maharashtra Political News:

शिवसेना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.  उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन रामदास कदम आणि खासदार गजानन किर्तीकरांमध्ये वाद सुरू आहे.

रामदास कदम (यांनी गजानन किर्तीकर यांच्या मतदार संघावर दावा सांगितल्यानंतर किर्तीकरांनी अधिकृत पत्राद्वारे रामदास कदम यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना रामदास कदम यांनी गजानन किर्तीकरांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

"सध्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीतच शिमगा बघायला मिळतोय. शिवसेनेच्या नेत्यांमध्येच फटाके फुटत आहेत. हे चित्र दुर्दैवी असून हा बेशिस्तपणा असल्याचे रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणत गजाभाऊंसारख्या जेष्ठ नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती.." असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.

" गजानन किर्तीकरांना (Gajanan Kirtikar) पाडण्याचा मी १९९० मध्ये प्रयत्न केला होता. हा आरोप पुर्णपणे खोटा असून माझ्या बदनामीसाठी हे कटकारस्थान रचल्याचा गंभीर आरोपही यावेळी रामदास कदम यांनी केला. ९० मधील निवडणुकीची आत्ता ३० वर्षानंतर आठवण आली का?" असा सवालही रामदास कदमांनी उपस्थित केला आहे.

Ramdas Kadam
Jayant Patil: चुकीचं प्रमाणपत्र व्हायरल करणारे तक्रारींना तोंड देतील; शरद पवार यांचा जातीचा दाखला व्हायरल करणाऱ्यांना जयंत पाटलांनी सुनावलं

तसेच "गोरेगाव येथील कार्यालयात वडील आणि मुलगा एकाच कार्यालयात बसतात. आपल्या खासदारकीचा निधी मुलाला विकास कामे करण्यासाठी देत आहेत. असे म्हणत गजानन किर्तीकर हेच आपल्या मुलासाठी पक्षाशी गद्दारी करत असून आपले पितळ उघडे पाडल्यानेच पित्त खवळले असल्याचेही रामदास कदम म्हणालेत. (Latest Marathi News)

Ramdas Kadam
Viral Video: आजोबा रेल्वे रुळ ओलांडत होते, इतक्यात भरधाव 'वंदे भारत' ट्रेन आली अन्... VIDEO पाहून थरकाप उडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com