Viral Video: आजोबा रेल्वे रुळ ओलांडत होते, इतक्यात भरधाव 'वंदे भारत' ट्रेन आली अन्... VIDEO पाहून थरकाप उडेल

Viral Video: व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तामिळनाडूच्या मलप्पुरम जिल्ह्यातील आहे.
 Viral Video News
Viral Video NewsSaamtv
Published On

Viral Video News:

देवतारी त्याला कोण मारी असे म्हणतात ते काही खोटं नाही. भीषण अपघातात, दुर्घटनेत आश्चर्यकारकपणे जीव वाचल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. अगदी काही सेकंदात मृत्यूला चकवा दिल्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

प्रवास करताना, रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रुळ क्रॉस करताना अनेकदा आपल्याकडून नियमांचे पालन होत नाही. अनेक लोक घाई-घाईत रेल्वे स्टेशनवर कसल्याही नियमांचे पालन न करता रुळ ओलांडला जातो. अनेक प्रवासे पुलावरुन न जाता अनेकदा रेल्वे ट्रॅकवरुनच जाणे पसंद करतात. मात्र या छोट्या छोट्या चुकाच मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात.

सध्या सोशल मीडियावर (social media) असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका रेल्वे स्थानकारवर वृद्ध व्यक्ती रेल्वेरुळ ओलांडताना दिसत आहे. मात्र याचवेळी अचानक भरधाव वंदे भारत ट्रेन येते. ट्रेन आणि वृद्ध आजोबांमधील अंतर इतकं कमी होतं की अवघ्या काही सेकंदासाठी त्यांचा जीव वाचल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तामिळनाडूच्या (TamilNadu) मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूर तालुक्यच्या  रेल्वे स्थानकावरील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. इतक्यात भरधाव वंदे भारत ट्रेन त्याच ट्रॅकवरुन येताना दिसत आहे.

ट्रेन आजोबांना जोराची धडक देणार इतक्यात आजोबा प्लॅटफॉर्मवर चढण्यात यशस्वी होतात अन् मोठा अनर्थ टळतो. अवघ्या काही सेकंदासाठी या आजोबांचा जीव वाचला. रेल्वे स्थानकावरील सर्व प्रवासीही ही घटना थक्क होऊ पाहत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून अशा चुका न करण्याचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

 Viral Video News
Viral Video: भयंकर! मोबाईल चार्जिंगला लावून गप्पा मारत होता, तितक्यात भीषण स्फोट झाला अन् .... पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com