Nitesh Rane/ Narayan Rane Saam TV
मुंबई/पुणे

Breaking : राणे पिता-पुत्रांना दिशा सालियान प्रकरणात अटक नाही पण...

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस (Police) स्थानकात FIR दाखल करण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना दिंडोशी कोर्टाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. कारण या दोघांना १० तारखेपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. काही दिवसांपासून राणे पिता-पुत्रांवरती (Narayan Rane and BJP MLA Nitesh Rane) अटकेची टांगती तलवार होती कारण नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस (Police) स्थानकात FIR दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणे यांना मालवणी पोलिसांनी चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली होती.

त्यामुळे दिशा सालीयन प्रकरणी त्यांना अटक होतेय की काय अशी शक्यता असतानाच आता त्यांना १० तारखेपर्यंत त्यांना अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र उद्या नितेश राणेंना १ वाजता मालवणी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास कोर्टाने सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये त्यांना सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन (Disha Salian) यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला होता. तसंच दिशा सालियानवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला होता आणि त्यांच्या याच वक्तव्यांमुळे दिशाच्या आईने मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आणि त्यानंतर मालवणी पोलिसांनी नितेश राणे यांनी ३ मार्च तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT