Ram Navami 2024: Artist Ayush Kamble Create Mosaic Artificial Flower Portrait Of Lord Shree Ram on The Occasion of Ram Navami 2024 Saam tv
मुंबई/पुणे

Ram Navami 2024: रुप तुझे मनोहर, दिसते किती विलोभनीय...; रामनवमी निमित्त बालकलाकराने साकारले प्रभू श्री रामाचे विश्वविक्रमी पोर्ट्रेट

Ram Navami Festival Special | Mosaic Portrait of Lord Ram: १७ एप्रिलला देशात रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-मयुर राणे

Artificial Mosaic Portrait of Lord Ram:

१७ एप्रिलला देशात रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा (Celebrate) केला जातो.

यानिमित्ताने मुंबईतील पवई मधील सात वर्षाचा बालकलाकार आयुष सिद्धार्थ कांबळे याने तब्बल ३,५०० आर्टिफीशियल फुलांपासून प्रभू श्री रामाचे (Lord Ram) मोझॅक पोर्ट्रेट साकारले आहे.

1. पोर्ट्रेट बनवण्यासाठी १२ तासांचा कालावधी

हे पोर्ट्रेट ३ फुट लांब व ४ फुट रुंद आहे. या पोर्ट्रेट मध्ये ६ रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी १२ तासाचा कालावधी लागला. या चित्रातील प्रभू श्री रामाचा स्मित हास्य करणारा चेहरा विशेष आकर्षण आहे. या पोर्ट्रेट ची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मधे केली आहे.

बालकलाकार आयुष कांबळे याने या आधीही साडे चार वर्षाचा असताना माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारून विश्वविक्रम केला होता. मोझॅक पोट्रेट साकारत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. या पोट्रेटची दखल घेऊन त्यांनी त्याचे फोनवरुन कौतुक देखील केले होते.

रामनवमी निमित्त ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम राबविले जातात. तसेच यामध्ये रामाचे रुप घेऊन रामायणाचा कार्यक्रमही केला जातो. रामनवमीच्या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा देखील काढली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT