Rajesh Tope's Appeal to the Public about coronavirus Saam Tv
मुंबई/पुणे

Corona: केंद्राच्या पत्रावर आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान; जनतेला केलं 'हे' आवाहन

Rajesh Tope's Appeal to the Public about coronavirus: चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारनचे पाच राज्यांना पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले आहे. देशभरात कोरोना (Corona) आटोक्यात आला आहे. मात्र काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय. तसेच कोरोनाची स्थिती कंट्रोलमध्ये असून लसीकरणही समाधानकारक असल्याचं टोपे म्हणाले. (Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Haryana, Uttar Pradesh, Delhi, Maharashtra, and Mizoram on the increasing positivity rate and cases)

हे देखील पहा -

राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची राज्यात स्थिती कंट्रोलमध्ये आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाही. लहान मुलांच्या लसीकरणाचं (Vaccination) प्रमाण समाधानकारक आहे. केंद्राने पत्र पाठवले आहे त्यात अन्य राज्यांचाही उल्लेख आहे. राज्यातील 135 पैकी 85 रुग्ण मुंबईत आहेत. बूस्टर डोसबाबत केंद्राने निर्देश दिले नाहीत. पण, जर कोणाला बूस्टर डोस घ्यायचा असेल तर खासगी रुग्णालयातून घेऊ शकता. काळजी करण्याचे कारण नाही. काही प्रमाणात दिल्लीत रुग्ण वाढत आहेत. मात्र राज्यात मास्क बंधनकारक नाही असं टापे म्हणाले आहे.

चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पाच राज्यांना पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या ५ राज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्राची आकडेवारी काय?

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 127 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. तर मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 108 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 77,27,551 झाली आहे. सध्या राज्यात 660 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT