Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray Tweet : '... तर गालावर वळ उठतील', मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे आक्रमक

Political News : सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeay News :

मराठी महिलेला मुंबईतील मुलुंडमध्ये घर नाकारल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

राज ठाकरे यांना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं का, 'मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.' (Latest Marathi News)

'हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे', असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. (Mumbai NEws)

'काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे', असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं?

तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथे एका सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता तिथे त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही असं त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितलं.

मात्र याबाबत तृप्ती यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तृप्ती यांना सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना मराठी माणसांच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्याला सर्वच राजकीय पक्षांना फटकारलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT