Mumbai News : मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्यांना दणका; उपमुख्यमंत्र्यांचा कडक इशारा, तर महिला आयोगाकडूनही दखल

Marathi woman denied house in Mulund : तृप्ती देवरुखकर असं या महिलेचे नाव असून तिने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
Mulund Incident
Mulund Incident Saam TV

Mumbai News :

मराठी महिलेला मुलुंडमधील गुजराती सोसायटीमध्ये ऑफिस नाकारल्याची चिड आणणारी घटना बुधवारी उघडकीस आली आहे. महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीत प्रवेश नसल्याची मुजोरीची भाषा सोसायटीच्या सेक्रेटरीने केली. यावेळी महिलेसोबत अरेरावी देखील करण्यात आली. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

तृप्ती देवरुखकर असं या महिलेचे नाव असून तिने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महिलेची अडचण समजून याबाबत सोसायटीच्या सेक्रेटरीला मनसे स्टाईलमध्ये जाब विचारला. मनसेच्या दणक्यानंतर अरेरावी करणाऱ्या व्यक्तीला माफी मागायला लागली. या घटेनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे. (Latest Marathi News)

Mulund Incident
Mumbai Ganesh Visarjan 2023: मुंबईत गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणते रस्ते बंद, कोणते सुरु? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नेमकं काय घडलं?

तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथे एका सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता तिथे त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही असं त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितलं.

मात्र याबाबत तृप्ती यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तृप्ती यांना सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना मराठी माणसांच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्याला सर्वच राजकीय पक्षांना फटकारलं.

अजित पवार काय म्हणाले?

कुणाची अशी मक्तेदारी चालू देणार नाही. असा प्रकार महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेऊ. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचं धाडस होणार नाही अशी भूमिका घेऊ. महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. नेमकं तिथं काय झालं याची माहिती घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. (Mumbai NEws)

Mulund Incident
Excessive Noise Effects: मिरवणूक, DJ, डान्स आणि मृत्यू! आवाजाच्या अधिक गोंगाटामुळे खरंच मृत्यू होतो का?

महिला आयोगाकडून दखल

तृप्ती देवरुखकर यांच्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम वागणूक देऊन मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com