
आवाज वाढव डिजे तुला आईची शप्पथ आहे. हे गाणं ऐकायला फार छान जरी वाटतं असलं तरी, डिजेवाल्याला शप्पथ टाकून आवाज कमी करायला आवर्जून सांगा. कारण आवाज वाढलेल्या डिजेवर आपण तासभर ताल धरलाच तर, नंतर आपलं ह्रदय ताल धरेल की नाही. याची गॅरंटी फार कमीये. कारण डिजेच्या वाढलेल्या आवाजामुळे चक्क दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील शेखर पावशे आणि वाळवा तालुक्यातील प्रवीण शिरतोडे अशा या दोन्ही तरुणांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूचं कारण डी.जे.चा गोंगाट ठरलाय. विशेष म्हणजे शेखर पावशे या तरुणाची 10 दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली होती.
अशा आवस्थेत तो डिजेत बेभान होऊन नाचला, मात्र मिरवणुकीत गुलालाने माखलेल्या मित्राला गोंगाटाचा त्रास झालाय. याची जराही कल्पना त्याच्या मित्रांना नव्हती. अखेर गणपतीची ही मिरवणूक त्याच्या आयुष्याची शेवटची मिरवणूक ठरली. (Latest Marathi News)
आवाजाने खरंच मृत्यू होतो?
आवाजाने फक्त श्रवण क्षमता कमी होते असं नाही तर, आवाजाच्या अधिक गोंगाटामुळे विविध शारीरीक आणि मानसिक त्रास होऊ शकतात. सण उत्सवात वाजणाऱ्या डिजेचा आवाज हा 100DB पेक्षा जास्त असतो आणि 40DB पेक्षा जास्त आवाज आपण जास्त वेळा ऐकला तर, त्याचा काही ना काही परीणाम आपल्या शरीरावर उद्भवतो.
सतत होणाऱ्या गोंगाटाचा आपल्या शरीरावर किती भयंकर परिणाम होऊ शकतो, याची आपण कल्पना करू शकतो. त्यातल्या त्यात हृदयाशी संबधीत आजारा असलेली व्यक्ती, लहान मुले, वृद्ध यांना याचा सर्वाधिक धोका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे सणासुदीला आनंद जरुर व्यक्त करा. पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय का? याचा जरूर विचार करा...
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.