मुंबई/पुणे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

Raj Thackeray Speech : भाजप नेते अण्णामलाईंच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी समाचार घेतला. यावेळी अण्णामलाईंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांवर राज ठाकरेंनी टीका केली.

Vishal Gangurde

ठाकरे बंधूंची ठाण्यात जाहीर सभा

राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा

ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांनाही टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते भाजप अण्णामलाई यांच्यावर निशाणा साधला. अण्णामलाई यांच्या वक्तव्याचं समर्थन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

मनसे, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा ठाण्यात मेळावा पार पडला. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

एका माणसाने छाननीदरम्यान एबी फॉर्म गिळला. एक दिवस असता तर दुसऱ्या दिवशी वाट पाहता आली असता.

सोलापूरमध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. पाच-पाच हजारांना मते विकली जात आहेत.

शैलेश धात्रक , मनीषा धात्रक, पूजा धात्रक यांना १५ कोटींची ऑफर देण्यात आली. ही ऑफर त्यांनी नाकारली. राजेश्री नाईक यांना ५ कोटींची ऑफर आली. ती त्यांनी ही ऑफर नाकारली. सुशील आवटे यांना १ कोटींची ऑफर मिळाली होती.

त्यांच्याकडे कुठून पैसा येतोय. महाराष्ट्रभर पैसे वाटले जात आहेत. इतक्या वर्ष निवडणूक पाहिली. पण अशी निवडणूक पाहिली नाही. पोलीस आणि कोर्टात जाऊन उपयोग नाही.

बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण मनसेने उघडकीस आणलं होतं. त्यातील आरोपीला मारला. या प्रकरणाचा मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये मारला गेला. तर सहआरोपीला स्वीकृत नगरसेवक पद दिलं गेलं. मनसेच्या धमकीनंतर त्याने राजीनामा दिला.

भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करत आहेत. छगन भुजबळांना त्यांनीच जेलमध्ये टाकलं. आता आमच्यावर आरोप करत आहेत. ते खोट बोलत राहत आहेत. हे सर्व ससाणे आहेत. मालकाच्या हातावर बसून पक्षी मारून आणताहेत. स्व‍कीयांचे घात करत आहेत.

अदानींचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या. त्यानंतर माझा आणि अदानी यांचा फोटो बाहेर काढला. माझ्या घरी रतन टाटा, मुकेश अंबानी येऊन गेलेत. अनेक उद्योगपती येऊन गेलेत. तरी त्यांची पापे झाकायची का? दोन-तीन वर्षांचा फोटो दाखवत आहेत. ज्या वेळेला शहरावर संकट येईल, त्यावेळी राज ठाकरे दोस्ती पाहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT