गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत झाली. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मिश्किल उत्तरे दिली. सध्या मुलांमध्ये वाढलेल्या लठ्ठपणावर उत्तर देताना विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या मुलाखतीच्या एका प्रश्नाला फडणवीसांना दिल्लीला जायचंय, मी चायनीजची ऑर्डर दिलीये, आम्ही निघतो, असं उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त अमित ठाकरे यांचे सासरे डॉ संजय बोरुडे यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. डॉ. बोरुडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी फडणवीस आणि ठाकरेंनी मिश्किल उत्तरे दिली.
मुलांमधील वाढत्या लठ्ठपणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले,'मला हे कळलं असतं तर मी वजन कमी केलं नसतं का? खेळ खेळले पाहिजे. सुनेच्या रुपाने डॉक्टर माझ्या आयुष्यात आले. आता माझं वजन वाढू लागलं आहे. मी रोज बॅडमिंटन खेळतो, त्यातून ४७० कॅलरी कमी होतात. त्यामुळे मी योग्य मार्गावर आहे'.
'लठ्ठपणाचा आजार आहे, हे पालकांना कळायला मार्ग नाही. डॉक्टर तुम्ही यासाठी काही शोधलं पाहिजे. बाहेरच्या फास्टफूडमुळे हे सगळं वाढलं आहे. जिभेला वाईट ते चांगलं. जे चांगलं ते वाईट असं झालं. जपानमध्ये कुठे तरी मुलांना डबेच आणू देत नाही. शाळेत मुलांसाठी जेवण बनवलं जातं. शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर कशाची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जायचं आहे. मी पण चायनीजची ऑर्डर दिली आहे. आम्ही निघतो', असे ते पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.