Viral Video : मुंबईत मतदानासाठी आलेल्या होमगार्ड आणि पोलिसांची बाचाबाची; व्हिडिओ बघा

Home Guard and police clash : मुंबईत बंदोबस्तासाठी आलेले काही होमगार्ड घरी परतण्याची सोय न झाल्याने अस्वस्थ होते. यापैकी एका होमगार्डची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.
मुंबईत मतदानासाठी आलेल्या होमगार्ड आणि पोलिसांची बाचाबाची; व्हिडिओ बघा
Viral Video Saam tv

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील सहा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी पार पडलं. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी राज्यभरातील अनेक होमगार्ड कर्मचाऱ्यांनाही तैनात करण्यात आलं होतं. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर होमगार्ड घरी निघाले आहेत. मुंबईत बंदोबस्तासाठी आलेले काही होमगार्ड घरी परतण्याची सोय न झाल्याने अस्वस्थ होते. यापैकी काही होमगार्डची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबईत मतदानाच्या ड्युटीसाठी आलेले होमगार्ड घरी निघाले आहेत. मात्र, या होमगार्डना घरी जाण्यासाठी त्यांची सोय नव्हती. मतदानासाठी मुंबईत आलेल्या होमगार्ड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी होमगार्ड कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला.

मुंबईत मतदानासाठी आलेल्या होमगार्ड आणि पोलिसांची बाचाबाची; व्हिडिओ बघा
Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल

पोलिसांच्या शिवीगाळ केल्याचा आरोप केल्यानंतर होमगार्ड कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मतदानाच्या दिवशी बंदोबस्ताकरिता सर्व होमगार्ड मुंबईत आले होते.

मतदानानंतर वेळीच घरी परतण्याची सोय न झाल्याने होमगार्ड अस्वस्थ झाले. मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत मतदानासाठी आलेल्या होमगार्ड आणि पोलिसांची बाचाबाची; व्हिडिओ बघा
Satara Peacock Viral : माणसाळलेला मोर बघा! बिनधास्त पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतोय, मोबाइल कॅमेऱ्यासमोरही देतो पोझ, Video

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

या व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि होमगार्ड दिसत आहेत. दोघांमध्ये भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोलीस होमगार्ड कर्मचाऱ्यांवर भडकलेले दिसत आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून होमगार्ड कर्मचाऱ्यांना बोलणं ऐकण्यास सांगत आहेत. तर दुसरीकडे होमगार्ड शिवीगाळ केल्याचा आरोप करत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com