आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार कंबर कसली आहे. एकीकडे मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे मनसेकडून मतदारयादीतील घोळ उघडकीस आणले जात आहेत. याच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मनसे मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम व्होटचोरी डेमोवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
गेल्या अनेक वर्षांपासून मी व्होटचोरीविषयी सांगतोय. अनेक जण म्हणतात, राज ठाकरे यांच्या भाषणाला लोक जमतात. पण मत मिळत नाही, कारण हे सर्व सुरु आहे.
लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण या भानगडीमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतोय . यातून सत्तेत आल्यानंतर हवीतशी सत्ता राबवायची.
आपण काय सांगतोय, मतदारयाद्या स्वच्छ करा. गेली ५ वर्षे निवडणूक झालेली नाही. आणखी एक वर्ष लागली तरी चालेल. त्याने काय फरक पडतोय.
१ तारखेचा मोर्चा खणखणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटली आहे, ती दिल्लीत पोहोचली पाहिजे. शिवाजी पार्कसारखी परिस्थिती नाही.
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना,मतदारांना सांगतोय की, मोर्चामध्ये सामील व्हा. तो व्यक्त करण्यासाठी यावं लागेल.
बॉसने मोर्चाला सुट्टी दिली नाही, तर त्याला मारा. पण मोर्चामध्ये सहभागी व्हा. शनिवारचं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉस पण मतदार असेल. तर त्यालाही घेऊन या. मतदारांचा अपमान सुरु आहे .
पत्रकार माझ्या घराच्या बाहेर उभे असतात. रोज माझी गाडी घरातून बाहेर जाताना आणि घरात पुन्हा येताना शूट करत असतात. मी म्हटलं रोज एकच गाडी शूट करून कंटाळा येत नाही का
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, आयुक्तांच्या बंगल्यावर साडे पाचशे मतदारांची नोंदणी आहे. विकसित देश बॅलेट पेपर वापरत असताना भारतात ईव्हीएमचा आग्रह कशाला पाहिजे.
अमेरिकेसारख्या देशातही बॅलेट पेपरने मतदान होतं. पण भारतात मात्र सदोष ईव्हीएम आणि बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका जिंकल्या जात आहेत.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणली पाहिजे. तसेच मतदार याद्या त्वरित स्वच्छ केल्या पाहिजेत.
महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड आणि साल्हेर यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांवर 'नमो पर्यटन केंद्र' उभारण्याच्या निर्णय घेण्यात आलाय.
'सत्ता असो नसो...उभं केलं की फोडून टाकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभागाकडून ही केंद्रे उभारली जात आहे. यामागे केवळ चाटुगिरी आहे.
या केंद्रांमुळे पर्यटकांना आधुनिक सुविधा मिळतील आणि पर्यटन वाढेल. मात्र, गड-किल्ल्यांवर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.