राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले! Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!

अमोल कविटकर, पुणे

पुणे - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि त्यांचे पुत्र अमित Amit Thackeray चांगलेच एक्टिव्ह झाल्याचे चित्र आहे. पुणे Pune, नाशिक Nashik आणि ठाण्यावर या पिता-पुत्रांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ठाकरे पिता-पुत्रांच्या ऍक्टिवपणाचा परिणाम काय होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.

हे देखील पहा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे दौरा आटोपून पुणे दौऱ्यावर आहे. तर अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे. ठाकरे पिता-पुत्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ॲक्टिव होताना पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच राज ठाकरे यांनी अवघ्या पंधरा दिवसाच्या आतच पुण्यासाठी दुसरा दौरा केला आहे. तर नाशिकमध्येही अमित ठाकरे पक्ष संघटनेचा दुसऱ्यांदा आढावा घेत आहेत. पुण्यात तर विधानसभा पदाधिकारी नेमण्यापासूनच राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहेत. म्हणूनच शहर प्रमुखांनी घ्यायच्या मुलाखती थेट स्वतः राज यांनीच घेतल्या आहेत.

नाशिक महापालिका २०१२ ते २०१७ पर्यंत मनसेच्या ताब्यात होती. तर पुण्यातही नगरसेवकांची संख्या तिशीपर्यंत पोहोचली होती. मात्र २०१७ च्या निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेची सत्ता गेली आणि पुण्यात नगरसेवकांची संख्या अवघ्या दोन वर आली. मात्र हे सगळे मागे टाकून मनसे पुन्हा एकदा उभारी घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार की वेगवेगळ्या चुली मांडणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे भाजप सारखा मोठा पक्षही मैदानात आहे. या राजकीय गणितात मात्र मनसेला किती स्पेस मिळते याकडे सर्वांच्याच्या नजरा आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT