Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray : राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन मनसे आक्रमक; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 'हे' आदेश

भाजप, शिंदे गट आणि आता मनसे राहुल गांधींविरोधात मैदानात उतरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Sawarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापू लागलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने राहुल गांधी यांच्या फोटोला जोडो मार आंदोलन सुरु केलं आहेत. तर भाजपनेही राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलंय. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गट आणि आता मनसे राहुल गांधींविरोधात मैदानात उतरली आहे. आता राहुल गांधींना मनसे कार्यकर्ते कुठे काळे झेंडे दाखवतात हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही?- उद्धव ठाकरे

ज्यांच्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्याशी काहीच संबंध नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारु नये. त्यांनी सावरकरांबद्दल प्रेम व्यक्त करणे हास्यास्पद आहे. सावकरकांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एवढी वर्ष सत्तेत आहेत मग सावरकरांना भाजपने भारतरत्न का दिलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT