Raj Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: 'मुख्यमंत्रीही ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना परवडणारा नाही...' टोल दरवाढीवरुन राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray Meet Avinash Jadhav: मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या ४ दिवसांपासून टोल दरवाढी विरोधात आंदोलनास बसले आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी

MNS Protest News:

मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या ४ दिवसांपासून टोलदर वाढी विरोधात आंदोलनास बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी मनसेचे हे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

काय म्हणाले राज ठाकरे?

यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी "रस्ते नीट बांधले जाणार असतील तर टोल का वसुल करता? टोलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखल केलेली याचिका का मागे घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली?" असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. "तसेच मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, निवडणूका तोंडावर आल्यात. लोकांचा आक्रोश त्यांना परडवणारा नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अविनाश जाधव यांचे उपोषण मागे..

तसेच "अविनाश जाधवला (Avinash Jadhav) फोन केला. उपोषण वगैरे आपलं काम नाही, लोकांसाठी जीव गमावू नकोस, एक माणूस मेल्याने यांना काही फरक पडत नाही असे म्हणत अविनाश जाधवला उपोषण मागे घ्यायला लावल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही" त्यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना "राज ठाकरे यांनी टोलदरवाढीवरुन संताप व्यक्त केला. रस्ते नीट बांधले जात नाहीत तर कर का घेतला जातो. रोड टॅक्स आणि टोलही भरला जातो, हे पैसे जातात कुठे?" असा सवालही त्यांनी विचारला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT