मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राज ठाकरे यांनी गंगा प्रदुषण, कुंभमेळा, औरंगजेबाची कबर, संतोष देशमुख प्रकरणावर भूमिका मांडल्या. राज यांनी ठाकरी शैलीतून घणाघात केलाय. या मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांना पुन्हा लाव रे तो व्हिडिओ पॅटर्न पाहायला मिळाला. राज ठाकरे यांच्या भाषणातील १२ मुद्दे जाणून घेऊयात.
१) गेल्या निवडणुकीत मतदान करून ज्यांची मतं दिसली, त्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत, त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं, ते झालं. आता पुढे काय ते बघूया
२) महाराष्ट्रातही परिस्थिती तशीच आहे. सावित्री नदी तर केमिकलने भरलीये. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहे. यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत.
३) प्रदूषणाच्या स्टँडर्ड्स नुसार उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अतिवाईट आहे.
४) मुंबई एकूण ५ नद्या होत्या. त्यातील चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकलीये. एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा. मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते. जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही. तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोलले की, आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा, असे संदेश लावतो. देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडे कुठून येतात, जंगले तोडूनच ना? विद्युतदाहिन्या आल्या आहेत, पण तरीही अनेक लोक विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधान मोदींना जंगलांची आवड आहे. आता ते अंबानींच्या वंताराला गेले. त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगले त्यांनी वाचवली पाहिजेत.
५) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होताहेत. दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होताहेत. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढताहेत.
६) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होताहेत. महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होताहेत. महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होत आहे.
७) औरंगजेबाची कबर सजवली आहे. ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला आहे.
८) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरुये. अदानी हुशार आहे. आपण मात्र अडाणी निघालो.
९) लाडकी बहीण योजनेचं काय चाललंय? विधानसभेत चर्चा सुरू आहे, कशावर तर औरंजेबावर सुरु आहे. तुमच्या प्रश्नावर नाही.
१०) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं. तर माझ्या मनसैनिकांवर केसेस टाकल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं की, रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. पण प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच आहे. दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकलेय. त्यांना जमतं, मग आम्हाला का जमत नाही?
११ ) बीडमध्ये संतोष देशमुखांना क्रौर्याने मारलंय. जे वीज कंपनीच्या राखेवरून घडलंय. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो असं म्हणतात. बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येताहेत. संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलंय.
१२) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाहीये. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा पडतोय. सरकारला ही योजना परवडणारी नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.