MNS raj thackeray artificial intelligence image
मुंबई/पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढणार; राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, मनसैनिक उद्यापासून कामाला लागणार

mns chief raj thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यभर ताकद वाढविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाकडून उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Vishal Gangurde

मनसेकडून राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम जाहीर

मनसे कार्यकर्ते सदस्य नोंदणीसाठी कामाला लागणार

मनसेचा संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रविवारी मोठा निर्णय घेतला आहे. मनसेच्या वर्धापण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गेमचेंजर निर्णय घेतला आहे. खरंतर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष पक्षाची सदस्य नोंदणी करणार आहे. यामुळे मनसेची ताकद महाराष्ट्रभर वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'मनसेचा ९ मार्च २०२६ रोजी २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा वर्धापन दिन आहे. या पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. मी उद्या सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात होणार आहे. रायगडाने छत्रपती शिवरायांचं वास्तव अनुभवलं आहे. त्यांचा शिवराज्यभिषेकाचा साक्षीदार देखील हा किल्लाच आहे. या पावन ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू करत आहोत'.

'सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नसून ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे. ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचंय. जे जे नव्याने जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं ठेवा आणि लोकांना पण द्या. सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत, असे राज ठाकरेंनी सांगितले.

'सदस्य नोंदणीचा तपशील १० मार्चला कळलेच. फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नसून वर्दळीच्या ठिकाणी महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत. उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत. येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत सभासद नोंदणी करा. यासाठी जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा, असे आदेश त्यांना दिले आहेत.

'प्रश्न आकड्याचा नसून तशीही सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे. सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे असे स्पष्ट होईल. त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल, यासाठी प्रयत्न करा, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT