Thackeray brothers Raj and Uddhav reunite on one stage at Worli Victory Rally after 19 years, sparking alliance speculation.  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

Marathi bhasha 5 July live news updates : तब्बल १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — आज वरळीतील एनएससीआय डोमवर एकत्र येणार आहेत. मराठी अस्मिता, मातृभाषा आणि ‘हिंदी सक्ती’विरोधातील लढ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ‘विजयी मेळावा’कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray and Uddhav Thackeray reunite after 19 : पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागला, त्यानंतर मातृभाषा मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातवारण तापलं आहे. आज वरळी डोम येथे विजयी मेळावा होणार आहे. १९ वर्षानंतर या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रातून विजयी मेळाव्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक रवाना झाले आहेत. सकाळी १० वाजल्यानंतर या मेळाव्याला सुरूवात होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात नव्या युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहे, राज्याच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण आहे.

वरळी, दादरमध्ये बॅनरबाजी -

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत विजय सभा घेणार आहेत. त्याआधी दादर, शिवाजी पार्कसह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आवाज मराठीचा, कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

तर आवाज मराठीचा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे फोटो त्याचबरोबर विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊलींचा बॅनर फोटो लावण्यात आलेले आहेत.

आवाज मराठीचा विजय उत्सव आज साजरा होतोय. राज ठाकरे उद्धव, ठाकरे एकत्र यावेत अशी शिवसैनिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आज त्याची सुरूवात झाल्याचं अनेकांचे दिसत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक वरळीमध्ये दाखल झाले आहेत.

१९ वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल १९ वर्षानंतर एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे वरळीतील एनएससीआय डोम येथे होणाऱ्या विजयोत्सव मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मेळाव्याला ठाकरे बंधूंनी सगळ्या राजकीय पक्षांना आमंत्रित केले. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे समोर आलेय.

शिंदेंवर हल्लाबोल करणार का?

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ सोबतच ‘जय गुजरात’चाही नारा दिला. यावरुन विरोधकांची चौफेर टीका सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली आहे. आज याबाबत ठाकरे बंधूंकडून काय प्रतिक्रिया येतेय, याची उत्सुकता मनसे-शिवसैनिकांना लागली आहे.

मनसे-शिवसेना युती होणार का?

गेल्या काही वर्षांपासून दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा प्रत्येक मराठी माणसाची होती. शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांकडून अनेकदा याबाबतची इच्छा बोलून दाखवण्यात आली होती. आता ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, तर ही युतीची सुरूवात असू शकते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एकत्र येण्याची साद घातली होती, त्याला उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद देण्यात आला होता. आता ठाकरे बंधू एकाच मंचावर येत आहेत, त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT